मुंबईतील अपक्ष उमेदवाराला स्वत: मत देऊनही शून्य मते

0
8

मुंबई दि.०१ मार्च : ईव्हीएम मशीनच्या गोंधळाची चर्चा राज्यभरात सुरु असताना आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे. श्रीकांत शिरसाठ या अपक्ष उमेदवाराला मुंबई उपनगरातील साकीनाका भागात चक्क शून्य मते मिळाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिरसाठ यांनी स्वत:ला मतदान केल्यामुळे आपण आणि आपल्या कुटुंबियांनी दिलेल्या मतांचे काय असा प्रश्नच शिरसाठांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.

श्रीकांत शिरसाठ आणि त्यांच्या कुटुंबियांनी नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत श्रीकांत शिरसाठ यांना मत दिले होते. असे असताना आपल्याला शून्य मते कशी पडली, असा प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. याप्रकरणी श्रीकांत शिरसाठ यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सहारिया यांना निवेदन दिले आहे. श्रीकांत शिरसाठ हे सकिनाका ९०-फिट, वार्ड क्रमांक १६४मध्ये अपक्ष म्हणून पालिका निवडणूक लढत होते. या प्रभागातील इतर उमेदवारही श्रीकांत शिरसाठ यांच्यासोबत ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले.