शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन सत्तेतील दोन्ही पक्षांची घोषणाबाजी

0
8

मुंबई: विधीमंडळ परिसरात आज अजब चित्र पाहायला मिळाले. एरव्ही विरोधी पक्षाचे आमदार सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसतात, मात्र आज सत्तेतील शिवसेना आणि भाजपचे आमदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन विधानसभेत गदरोळ झाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, अशा घोषणा शिवसेना आमदारांनी केल्या.आधी शिवसेना आमदारांनी घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले. शिवसेना आमदरांनी वेलमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला.मग भजाप आमदारांनीही आक्रमक पवित्रा घेत, त्यांनीही शेतकरी कर्जमाफीसाठीच घोषणाबाजी सुरु केली.या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दुपारी 12 पर्यंत तहकूब करण्यात आलं.यानंतर मग शिवसेना आमदरांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीला सुरुवात केली.मग भाजप आमदारांनीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करून खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे.विरोधी पक्षातले नेते नाटक करतात.शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. 100% कर्ज माफ व्हावी ही भाजपची भूमिका. मुख्यमंत्र्यांना विनंती की खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, बोगस बँकधारकाना कर्जमाफी देऊ नये.
शिवसेना आमदारांची भूमिका
राज्यात शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. भाजपचा विजयाचा वारु उधळला असला तरी शेतकऱ्यांची परिस्थिती तशी नाही. शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत सेनेचा लढा सुरु राहिल.
भाजप कुणाकडे कर्जमुक्ती मागत आहे? हे राजकीय षडयंत्र आहे. आमचे मंत्री सरकारशी चर्चा करतात पण त्यांना यश येत नाही. महापौर निवडणूक आणि आज आंदोलन केले याचा संबंध नाही. शेतकऱ्यांचं राजकारण आम्ही करत नाही.भाजपचे आंदोलन म्हणजे मगरीचे अश्रू आहेत.