देवरी येथे ओबीसी संघर्ष कृती समितीची बैठक उत्साहात

0
5

देवरी- ओबीसी संघर्ष कृती समिती तालुका शाखा देवरीची बैठक काल गुरूवारी (ता.09) स्थानिक सभागृहात उत्साहात पार पडली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बबलू कटरे हे होते. यावेळी जिल्हासचिव सुरेश भदाडे, चंद्रसेन रहांगडाले, भरत शरणागत, कृष्णा ब्राम्हणकर, सुदर्शन लांडेकर, वाय बी कटरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सभेत ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघर्ष आणखी तीव्र करण्याविषयी चर्चा करण्यात आली.
प्रास्ताविक कृष्णा ब्राम्हणकर यांनी केले. उपस्थितांचे आभार भरत शरणागत यांनी केले. यावेळी तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.