सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

0
13

मुंबई, दि. 16 : राज्य पोलीस दलातील आठ सहायक आयुक्त/उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत.रामचंद्र नामदेव पठारे यांची मुंबईमधून पुणे जिल्ह्यातील खेड उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली असून, महादेव श्रीपती गावडे यांची चिपळून उपविभागीय पदावरून पुणे शहरामध्ये बदली करण्यात आली आहे. सीआयडीमधून ज्ञानेश्वर दशरथ शिवथरे यांची लोणावळा उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. यासोबतच चिन्मय पंडीय (खेड, रत्नागिरी ते अहमदनगर), अनंत केंजळे (लोहमार्ग, नागपूर ते मुंबई), संदीप शिंदे (शासकीय परिवहन सेवा, मुंबई ते विभागीय मोटार कार्यशाळा, औरंगाबाद), बजरंग बनसोडे (अहमदनगर ते पोलीस अकादमी, नाशिक), डॉ. शीतल जानवे (मुख्यालय, रत्नागिरी ते खेड उपविभाग, रत्नागिरी) यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.