मकरधोकडा ,पाळा येथील आश्रमशाळेची मान्यता रद्द

0
10

बुलडाणा दि.२६-: आदिवासी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे चर्चेत आलेल्या पाळा येथील कोकरे आश्रमशाळेची मान्यता अखेर रद्द करण्यात आली आहे.विद्यार्थिनीवरील अत्याचारप्रकरणी राज्यातील चार आश्रमशाळांची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी विधानसभेत दिली. यात तालुक्यातील पाळा येथील कोकरे आश्रमशाळा, गोंदिया जिल्ह्यातील मकरधोकडा
येथील आश्रमशाळा, सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील आश्रमशाळा व बीड जिल्ह्यातील सिंदफणा येथील आश्रमशाळेचा समावेश आहे. कोकरे आश्रमशाळेतील पाच मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण देशभर गाजले होते. या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापक व संचालकांसह ११ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल झाले. या प्रकरणामुळे राज्यभरातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे अनेक शाळांची तपासणी करण्यात आली होती. या खळबळजनक घटनेनंतर अन्य ठिकाणचे कुप्रकार उघडकीस आले होते. तेव्हापासून अशा असुरक्षित आश्रमशाळांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी होत होती.