गोरेगाव तालुक्यात ५ ते १२ एप्रिल पर्यंत ग्रामसभेचे आयोजन

0
17

गोरेगाव दि.२६-:गावस्तरावर शेतकर्‍यांची महत्वाचे कामे निकाली काढण्यासाठी गोरेगाव तालुक्यात येत्या ५ ते १२ एप्रिल पर्यंत सायंकाळी ६ वाजता प्रत्येक गावात ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या ग्रामसभेमध्ये वडिलाच्या मृत्यूनंतर मुले व मुली यांचे वारस हक्काने सातबारावर नोंदविणे, वडील व मुले यांच्यामध्ये किंवा भावा-भावांमध्ये शेतजमिनीची वाटणी करुन खाते फोड करणे, वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करणे, जमीन जर सिंचनाखाली असेल आणि त्याची नोंद सातबारावर झालेली नसेल अशा नोंदी अद्ययावत करुन घेणे, ज्या मुलीचे वारसाची नोंद सातबारावर झाली नसेल त्याची नोंद करुन घेणे, लक्ष्मी मुक्ती योजना या विषयासंबंधी शेतकर्‍यामार्फत अर्ज स्विकारण्यात येणार असून त्याचा निपटारा करणात येणार आहे.
तरी गोरेगाव तालुक्यात येणार्‍या सर्व गावातील शेतकर्‍यांनी ५ ते १२ एपिल पर्यंत आपल्या गावातील तलाठी व ग्रामसेवक यांचेशी संपर्क साधून या ग्रामसभेला उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले आहे.