जिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण विभागाचेजिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते उद्घाटन

0
10

नांदेड दि.30-श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचया हस्ते क्ष-किरण विभागाचे उद्घाटन करण्यात आले.जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी जिल्हा रुग्णालयास भेट दिली. याभेटी दरम्यान त्यांच्या हस्तेरुग्णालयातील क्ष-किरण विभागाचे उद्घाटनकरण्यात आले. यावेळी त्यांनीरुग्णालयातील विविध विभागाची पाहणी केली वविभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना महत्वपूर्ण निर्देश दिले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.पी.कदम यांनी रुग्णालयातील पोलीस चौकी कार्यान्वीत करण्याची मागणी केली.त्यावर जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी पोलीस चौकी तात्काळ चालू करण्यासाठी संबंधितांना सूचित करण्याचे निर्देश दिले. त्यांनीसंपूर्ण रुग्णालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.याभेटीदरम्यान वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी,रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.