दुबईत पावसाचे थैमान, शाळा बंद, विमानतळ बंद,कार गेल्या वाहून

0
9

दुबई झाली तुंबई, वाळवंटात आला पूर!
आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्यात;वाहतूक विस्कळीत
वर्षभरातील पाऊस झाला एकाच दिवसात
तर दुबईतील पुराच्या परिस्थितीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर झाले व्हायरल

दुबई:-पश्चिम आशियातील देश युनायटेड अरब अमिराती हा वाळवंटी देश म्हणून ओळखला जातो. पण, सध्या या देशात पावसाने हाहाकार माजवला आहे असंच म्हणावं लागेल. अनेक भागात पुराची स्थिती निर्माण झाली आहे.पावसाचा सर्वात मोठा फटका दुबईला बसला आहे. दुबईला येणारी अनेक विमाने दुसरीकडे वळवण्यात आली आहेत.

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेक फ्लाईट काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. भारतातून दुबईला जाणाऱ्या फ्लाईटना देखील याचा फटका
बसला असल्याचं कळतंय. शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय वाहतूक बंद झाली आहे.*

दुबई विमानतळ हे जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळापैकी एक आहे. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. १६ एप्रिलच्या अनेक फ्लाईट उशिरा धावत आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. भारत, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाईटना याचा मोठा फटका बसला आहे. दुबईतील पुराच्या परिस्थितीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दुबईमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पूर आला आहे. रस्ते, वाहने पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. अनेक लोकांना आपली वाहने आहे तेथेच सोडावी लागली आहेत. दुबईतील पाऊस पाहून अनेकांना मुंबईची आठवण झाली आहे. कारण, मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबईमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण होती. मुंबई झाली तुंबई असं आपण म्हणतो पण सध्या मुंबईची झाली तुंबई असं आपल्याला म्हणता येईल.

शेजारच्या ओमानमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या मोठ्या पुरात मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे आणि इतर अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत, असे देशाच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या राष्ट्रीय समितीने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ज्यात एका प्रौढ व्यक्तीसह वाहनात सुमारे १० शाळकरी मुले वाहून गेल्याचा देखील समावेश आहे, या नैसर्गिक त्रासदीवर ओमानच्या राज्यकर्त्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. ओमानसह बहारीन, कतार आणि सौदी अरेबियातही मुसळधार पाऊस पडला आहे.