23.8 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home महाराष्ट्र पेट्रोल 3 रुपयांनी महागले

पेट्रोल 3 रुपयांनी महागले

0
23

मुंबई,दि.22- राज्य सरकारने पेट्रोलवरील मुल्यवर्धीत करात (व्हॅट) वाढ केल्याने शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल 3 रुपयांनी महागले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे वाहनधारकांच्या खिशाला पुन्हा एकदा आर्थिक फटका बसला आहे. केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलचे दर दररोजच निश्चित करण्याच्या तयारीत असताना राज्य सरकारने अचानक पेट्रोलच्या दरात वाढ केल्याने संताप व्यक्त होत आहे.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यातील सर्व महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारु दुकाने आणि बियर बार बंद झाले आहेत. परिणामी राज्य सरकारचा महसूल बुडाला आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी सरकारने विचित्र उपाय शोधला आहे. तो म्हणजे पेट्रोलवरील व्हॅटमध्ये वाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला चाट लावल्याची संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.दरम्यान, येत्या 1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे. त्यावेळी सर्व कर रद्द होणे अपेक्षित आहे.