शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात गुन्हा

0
14

करमाळा, दि. 01 – महाराष्ट्र दिनानिमित्त तहसिल कार्यालयात ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेल्या आमदार नारायण पाटील यांना शेतक-यांना घेराव घातला. कुकडी प्रकल्पातील पाण्याचे उन्हाळ्यातील आवर्तन करमाळा तालुक्यास मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल-कोलते व मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी पाणी मागणा-या रश्मी बागल यांच्यावर हात उगारुन अर्वाच्य व शिवराळ भाषा वापरल्याने पाटील यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात अदखल पाञ गुन्हा दाखल झाला आहे.
बागल गटाचे नेते व मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी कुकडी प्रकल्पातील पाणी,उजनी धरण काठावरील शेती पंपाना विजेचा अपुरा व कमी दाबाने होणारा पुरवठा याप्रश्नी नारायण पाटील यांना १ मे,महाराष्ट्र दिनी जाब विचारण्यासाठी घेराव आंदोलन करण्याचा इशारा गेल्या आठवड्यात दिला होता.