ऑनलाईन वीजबील भरणा अधिकृत एजन्सीकडेच करावा : महावितरण

0
11

मुंबई, दि. 02 :-वीज ग्राहकांनी ऑनलाईन वीजबील भरणा महावितरणद्वारे नियुक्त अधिकृत एजन्सीद्वारेच करावा तसेच ऑनलाईनवीजबील भरताना एखाद्या एजन्सीबाबत शंका आल्यास शहानिशा करुन नंतरच वीजबील भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

        महावितरणने नियुक्त केलेले अधिकृत ऑनलाईन वीजबील भरणा केंद्र महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत.  या केंद्राद्वारेवीजबिलांचा भरणा केला जातो.  परंतु काही ठिकाणी महावितरणचे परवानगी नसलेले अनधिकृत ऑनलाईन वीजबील भरणा केंद्रेवीजबिलांचा भरणा करून घेतात त्या पैशांचा भरणा महावितरणकडे करीत नाहीत असे निदर्शनास आले आहे. अशा अनधिकृतकेंद्रांमुळे ग्राहकाने वीजबील भरूनही त्याची नोंद महावितरणकडे होत नाही. त्यामुळे संबंधित वीजग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केलाजातो   त्याचा त्रास ग्राहकांना होतो.

ऑनलाईन वीजबील भरणाऱ्या ग्राहकांनी वीजबील भरल्यावर त्याची पावती अवश्य घ्यावी, पावतीवरील ग्राहक क्रमांक,पावती क्रमांक बघून घ्यावा.  तसेच ऑनलाईन वीज बील भरताना आवश्यकता वाटल्यास खात्री करण्यासाठी मुख्य कार्यालय,मुंबईयेथे 022-26478246 या दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.