धनगर समाजाला दिलेल्या शब्दापासून मागे हटणार नाही: मुख्यमंत्री

0
11

नागपूर: महायुतीने धनगर समाजाला जो शब्द दिला आहे त्या शब्दापासून महायुती मागे हटणार नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. याशिवाय आदिवासी समाजाच्या आरक्षणातला वाटा आम्ही कोणालाही देणार नसल्याची भुमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. ते नागपुरात बोलत होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आरक्षणासंदर्भात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला आहे. धनगर समाजाला आरक्षणाचा फायदा मिळायला पाहिजे आणि याबाबत आमचं सरकार तातडीने निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

नगर जिल्ह्याला अहिल्याबाईनगर असं नाव द्यावं अशी मागणी धनगर समाजाच्या अधिवेशनात करण्यात आली आहे. हा विचार चांगला असला तरी या मुद्यावरून वाद होऊ नये म्हणून सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.