कृषिग्राहकांच्या वीज वेळापत्रकात बदल

0
17

मुंबई, दि. 08 मे :- राज्यात विविध कारणांमुळे विजेच्या मागणी आणि पुरवठ्याचा मेळ घालण्यात अडचणी येत आहेत.  विजेचे नियोजनकरण्यासाठी कृषिग्राहकांच्या  वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. त्यांना दिवसा 8 तास रात्री 8 तास अशा दोनटप्प्यांमध्ये रात्री 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यन्त अखंडित वीजपुवठा करण्यात येत आहे.  वीज स्थिती बदलताच कृषिपंपांना दिवसा 8तास रात्री 10 तास वीजपुरवठा करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.महावितरणला महानिर्मितीसह विविध स्त्रोतांकडून वीज पुरवठा होतो. परंतु विविध कारणांमुळे सुमारे 4,000 मे.वॅ. पर्यन्त विजेची उपलब्धताकमी असतांनाही महावितरणने केवळ 1,500 मे.वॅ. पर्यन्तच आवश्यकतेनुसार तात्पुरते भारनियमन सुरु केले आहे.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नामुळे भारनियमन आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नाला  यश मिळत आहे.ऊर्जामंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे कोळशाच्या पुरवठ्यात वाढ होत आहे.  तसेच तांत्रिक कारणांमुळे बंद असलेले संच युध्दपातळीवर सुरू करण्याचे प्रयत्नचालू आहेत.  तसेच इतर स्त्रोतांमधून विजेची उपलब्धता वाढविण्यात येत आहे.  त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले तात्पुरतेभारनियमन लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. तोपर्यन्त सध्याच्या कृषिपंपांच्या वेळापत्रकात बदल करून त्यांना रात्री 1 ते सायंकाळी 7 वाजेपर्यन्तदोन टप्प्यांमध्ये रात्री 8 तास दिवसा 8 तास थ्रीफेजचा वीजपुरवठा देण्यात येत आहे. वीजस्थिती पूर्ववत होताच त्यामध्ये बदल करून कृषिपंपांनारात्री 10 तास दिवसा 8 तास वीज देण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले असून या अडचणीच्या काळात सहकार्य करण्याचे आवाहनही केलेआहे.