अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या खाजगी वाहनावर होणार कारवाई

0
19

हिंगोली , दि. 6 : प्रवासी समन्वय समितीच्या बैठकीमध्ये खाजगी वाहनातुन होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याचे तसेच विना नोंदणी चालणाऱ्या वाहनाविरूध्द पोलीस विभाग व उप प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी दिली.
प्रवासी समन्वय समितीच्या बैठकीत अरविंद चावरिया बोलत होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, मोटार वाहन निरीक्षक अशोक जाधव, एस. टी. विभागाचे विभाग नियंत्रक, परभणी यांचे प्रतिनिधी श्री. चव्हाण, वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बानखाडगे, प्रवासी संघटनेचे धरमचंद बडेरा हे उपस्थित होते.
सदर मोहिम ही दि. 07 ते 17 जून, 2017 या कालावधीत वाहतुक शाखेचे अधिकारी / कर्मचारी तसेच उप प्रादेशिक परिवहन विभागाचे वायुवेग पथक हे करणार आहे.
तरी वाहन चालक / मालकानी त्यांनी त्यांच्या वाहनाची वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत जेणेकरून वाहनधारकाची गैरसोय होणार नाही, असे आवाहन करण्यात आले.