बुधवारी नायगाव बंदचे आवाहन

0
11

नायगाव दि. ६ -शेतकर्यांची कर्ज माफीसह विविध मागण्यांसाठी व फडणवीस सरकार चा निषेध करण्यासाठी बुधवारी दि. ७ रोजी नायगावची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येऊन आंदोलन करण्यात येणार आहे.
सतत च्या तीन वर्षाच्या दुष्काळामुळे संबंध महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला आहे. गेल्या अनेक दिवसा पासून राज्यातील विविध सामाजिक संघटना, शेतकरी संघटनां , विविध राजकीय पक्ष यांच्या वतिने कर्जमाफी मागितली .वविध आंदोलने केली. मात्र राज्यातील फडणवीस सरकार मात्र फारशे गांभीर्याने घेत नसल्याने पुणतांबे येथील शेतकर्यांनी शेतीमालाच बाजारात विक्रीसाठी न नेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्यातील शेतकर्यांचे स्फुल्लिंग पेटवले आहे. दिवसेंदिवस राज्यभर आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. या आंदोलनात आता नायगाव तालुक्यातीलही शेतकरी वर्ग उडी घेतला असून सरकार च्या निषेधार्थ बुधवारी दि. ७ रोजी नायगावची संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नायगावातील सर्व व्यापार्यांनी कापड मार्केट, सराफा बाजार, किराणा बाजार, फळे व भाजीपाला बाजार, मोंढा मार्केट बंद ठेऊन सहकार्य करावे असे आवाहन ही तालुक्यातील समस्त शेतकरी वर्गा कडून करण्यात आले आहे.