40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सोमवारी सह्याद्रीवर बैठक

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सोमवारी सह्याद्रीवर बैठक

0
17
मुंबई,दि..१७:- शेतकऱ्यांच्या थकित कर्जमाफीसंदर्भात निकष ठरविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ‘थकित कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ची सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तथा शेतकरी प्रतिनिधींसमवेत यांच्यासोबत येत्या सोमवारी (19 जून ) दुपारी 4 वाजता ही बैठक घेण्यात येणार आहे.
महसूल व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उच्चाधिकार समितीची 11 जून रोजी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतील प्रतिनिधींसोबत बैठक झाली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘थकित कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ स्थापन करण्यात आली आहे. ही समिती येत्या सोमवार (19 जून) पासून विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तथा शेतकरी प्रतिनिधींसमवेत थकित कर्जमाफी निकष ठरविण्यासाठी चर्चा करणार आहे.
‘थकित कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ने सोमवारी होणाऱ्या बैठकीसाठी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार बच्चू कडू, रघुनाथ दादा पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, शेतकरी संघटनांची सुकाणू समितीचे संयोजक डॉ. अजित नवले, बँक कर्मचारी प्रतिनिधी विश्वास उटगी, शेतकरी प्रतिनिधी सर्वश्री धनंजय जाधव (पुणतांबे), संजय पाटील, बळीराम सोळंके (माजलगांव) यांना निमंत्रित केले आहे.