राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेची वाढवली व्याप्ती

0
10
मुंबई, दि. 20 – आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढविण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय. योजनेच्या लाभासाठी निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांच्या यादीत कृषी पदवी या अभ्यासक्रमाचा समावेश. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे.
– सहा वर्षांसाठी अपात्र ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय पक्षांच्या सदस्याबाबत अंतिम निर्णयाचे अधिकार आता राज्य शासनाकडे. अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता.
– राज्य शासनाच्या निर्णयप्रक्रियेशी संबंधित धोरणात्मक विषयांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र धोरण संशोधन संस्था स्थापन करण्यास मान्यता.
– जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत मंजूर झालेल्या मात्र केंद्राकडून संपूर्ण अनुदान न मिळालेल्या अपूर्णावस्थेतील प्रकल्पांना राज्य शासनाकडून अनुदान देण्याचा निर्णय.
– लोणावळा नगरपरिषदेचे श्रीमान बाळासाहेब डहाणूकर रुग्णालय शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय.
– रायगड जिल्ह्यातील मौजा पारगाव हद्दीतील आदिवासीवाडीच्या पुनर्वसनासाठी नवीन पनवेलमध्ये भूखंड देण्याचा निर्णय.
– शासकीय दंत महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या दंतशल्यचिकित्सकांना सहाय्यक प्राध्यापक पदावर सामावून घेण्यास मान्यता.