आदर्शगाव योजनेचा निधी वेळेत खर्च करा-जलसंधारण मंत्री शिंदे

0
7

मुंबई, दि. 21 : शासनाने सुरू केलेल्या आदर्शगाव योजनेंतर्गतच्या उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्‍यात येतो. हा निधी शिल्लक न ठेवता  वेळेत खर्च करावा, असे निर्देश जलसंधारण मंत्री तथा आदर्शगाव योजना राज्यस्तरीय समिती अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी दिले.आदर्शगाव योजनेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत प्रा. शिंदे बोलत होते.बैठकीला आदर्शगाव योजना राज्यस्तरीय समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार,जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्‍ये मंत्री प्रा. शिंदे यांनी, आदर्शगाव योजना, त्यात काम करणाऱ्या संस्थांची कार्यशाळा घेणे, पुणे येथील आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती कार्यालयाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेली पदे, हिवरेबाजार येथील प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम, जलसंधारण कामाच्या प्रति हेक्टरी मापदंडाचे दर वाढविणे आदी बाबींचा जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांनी आढावा घेतला.