24.5 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभाग आय एस ओ मानांकन करणार- मुख्यमंत्री

शासनाच्या सर्व विभाग आय एस ओ मानांकन करणार- मुख्यमंत्री

0
25

मुंबई दि. २९:   शासनाच्या सर्व विभागांचे आय एस ओ मानांकन करून विभागाशी संबंधित सर्व कामकाजाची एक प्रमाणित कार्यपद्धती (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर)  विकसित केली जाईल, त्यास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि त्यांचे कार्यालय मागदर्शन करील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आज वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आय.एस.ओ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह वन विभागाचे सचिव विकास खारगे, इंडियन रजिस्टर क्वालिटी सिस्टीमचे प्रमुख शशी नाथ मिश्रा, ऑडिटर नरेंद्र गंगाखेडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते