अर्धवट कामाविरुद्ध चिमूरमध्ये नगरसेवकाचे उपोषण

0
6

चिमूर,दि.29 : कंत्राटदाराने कामे अर्धवट करून ठेवल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाला आणि कंत्राटदाराला वेळोवेळी कळवूनही दखल न घेतल्याने नगरसेवक उमेश हिंगे नगर परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत.चिमूर नगर परीषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 9 मधील विकास कामे कंत्राटदार यांनी अर्धवट ठेवली आहेत. तसेच इतर प्रभागात सुद्धा कामे पूर्ण न करता अर्धवट ठेवण्यात आल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र त्याची कोणतीही दखल न घेतली गेली नाही. अखेर 21 जूनला मागण्याविषयी निवेदन देऊन यावर कार्यवाही न झाल्यास 29 जूनपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र या इशाऱ्यानंतरही कारवाई न केल्याने हिंगे आजपासून उपोषणाला बसले आहेत.हिंगे यांच्या उपोषणाला विरोधी गटनेते नगरसेवक अब्दुल कदीर शेख, नगरसेवक विनोद ढाकुंनकर, नगरसेवक ऍड. अरुण दुधनकर, नगरसेवक गोपाल झाडे, नगरसेविका सीमा बुटके, नगरसेविका कल्पना इंदूरकर यांनी पाठींबा दिला आहे.