राज्यातील 288 सदस्य मतदान करणार राज्याचे मतेमूल्य 50 हजार 400

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई, दि.4 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राज्यातील विधानसभेचे 288 सदस्य मतदान करण्यास पात्र आहेत. प्रत्येक सदस्याचे मतमुल्य 175 इतके असून, 50 हजार 400 एवढे महाराष्ट्राचे मत मुल्य असणार आहे. अशी माहिती राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राज्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विधीमंडळ प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिली.
17 जुलै 2017 रोजी दिल्ली येथील मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रीयेबाबत डॉ.कळसे यांनी माहिती दिली. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निर्वाचन अधिनियमानुसार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. एकूण 31 राज्यांचे 4,120 विधानसभा सदस्य बॅलेट पेपर पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहितीही डॉ. कळसे यांनी यावेळी दिली. अधिक माहिती देताना ते म्हणाले की, 1971 च्या जनगणनेप्रमाणे राज्यातून 288 सदस्य मतदानास पात्र असून, प्रत्येकाचे मतमूल्य 175 इतके आहे. एकूण महाराष्ट्राचे मतमूल्य 50 हजार 400 इतके आहे.  देशातून एकूण 4120 आमदार आणि 776 खासदार म्हणजेच एकूण 4 हजार 896 सदस्य मतदान करण्यास पात्र आहेत. एकूण सदस्यांचे 10 लाख 98 हजार 903 एवढे मतमूल्य असणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे डॉ. कळसे यांनी सांगितले.