नांदेड महानगर पालिका आरक्षण सोडत जाहीर,महापौर पद sc महिलेसाठी राखीव

0
15

नरेश तुप्तेवार

नांदेड,दि.07-निवाडणुकीसाठी प्रभाग रचना व् आरक्षण ची सोडत यावेळी महापौर पद sc महिलेसाठी राखीव झाली आहे ही सोडत डॉ शंकरराव चौव्हान प्रेक्षकगृहात्  गुरुवारला झाली.यावेळी महापालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण व् हद्द रचना निवडणूक आयोगमार्फत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली उपायुक्त संतोष कदेवार, उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या चमूने केली.या बहुसदस्यीय प्रभाग रचनेतील ८१ नागरसेवकासांठी आरक्षण सोडत होती.
नांदेड महापालिकेच्या निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार असे संकेत आहेत त्यानुसार निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार प्रभाग रचना व् आरक्षण ची सोडत काढण्यात आली.नवीन बहुसदस्यीय प्रभाग रचना असल्यामुळे 20 प्रभागत ८१ सदस्य राहणार आहेत,१९ प्रभागात प्रत्येकी चार तर एका प्रभागात 5 सदस्य निवडून येतील. यापैकी 81 पैकी 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरित जागेत अनुसूचित जातिसाठी 15 ,अनुसूचित जमतिसाठी 2 तर इतर मागास प्रवर्ग साठी 22 तर सर्वसाधारण 42 जागा राखीव होत्या, 41 महिलांमध्ये अनुसूचित जातिसाठी 8 अनुसूचित जमतिसाठी 1 इतर मागास प्रवर्ग साठी 11 व् सर्वसाधारण 21 जागा राखीव आहेत.प्रभागरचना व् आरक्षण सोड़तीनंतर प्रभाग रचनेचा प्रारूप व् आरक्षण तपशील 8 जुलै रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. आयुक्तांच्या कार्यलयात हरकती,आक्षेप, व् सूचना स्विकारल्या जाणार आहेत त्यानंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार आहे.