रोही प्राण्याची बसला जबर धडक

0
9

बुलढाणा,दि.06- जिल्ह्यातील मोताळा-पराडा फाट्याजवळ आज दुपारच्या दरम्यान अचानक आलेले रोही प्राण्यापैकी एकाने बसला जबर धडक दिल्याने बसच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले.आज गुरुवारला दुपारी मलकापूर बसस्थानकावरून बस औरंगाबाद येथे जायला निघाली होती. दरम्यान मोताळा-पराडा फाट्याजवळ एक रोही प्राणी अचानक येऊन बसला आदळला. रोही प्राणी आणि बसची धडक इतकी जबर होती की त्यात बसचा समोरचा भाग चुराडा झाला. प्राण्याची धडक झाल्याने बसचे रेडियेटर फुटले आणि समोरील काच सुध्दा तुटले.अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून बस चालक किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु झालेल्या धडकेत मात्र रोही प्राण्याने आपले जीव गमावले आहे.