अमरनाथ याञेला गेलेल्या शिवभक्तांवर झालेल्या हल्याचा बिलोली पञकारांच्या वतीने निषेध

0
13

नांदेड /बिलोली दि.१३ : कश्मीरमध्ये असलेल्या बाबा अमरनाथ यांच्या याञेस गेलेल्या शिव भक्तांच्या बस वर झालेल्या अतिरेकी हल्यात ७ शिव भक्तांचा मृत्यू झाला.या घटनेचा  महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ बिलोलीच्या वतीने तिव्र निषेध करून हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई करून सतत भारत विरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी एका निवेदनाद्वारे या पञकार संघाचे मार्गदर्शक गोविंद मुंडकर यांच्या नेतृत्वाखाली  तहसिलदार गुंडमवार यांची भेट घेऊन पाकिस्तान विरोधी भावना शासनापर्यंत कळविण्याची मागणी केली.
पञकार संघाचे अध्यक्ष राजु पा.शिंदे ,बाबुराव इंगळे,माधव एडके, बसवंत मुंडकर, मकरंद बोधनकर ,माधव हळदेकर,पी.जी गायकवाड,प्रताप पा.भिंगे, सय्यद रियाज ,देविदास कोंडलाडे,बालाजी नरहरे,वैभव घाटे,दिलीप घाटे,सुनिल जेठे,राजु कुडके,संजय जाधव,कुरेशी आदि पञकार या वेळी उपस्थित  होते.