मुंबई, दि. १३ – विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी मनसेअध्यक्ष राज ठाकरे सरसावले असून यासंदर्भात त्यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत राज ठाकरेंनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी फडणवीस यांच्यासमोर काही उपाययोजनाही मांडल्या आहेत.
मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारी सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी दाखल झाले. याप्रसंगी त्यांच्यासोबत मनसेचे नेते अभिजीत पानसेही उपस्थित होते. या भेटीत राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पुस्तकांचे चाचणीनिहाय विभाजन, सर्व सहा विषयांचे दर तिमाही अभ्यासक्रमाचे एकच पुस्तक दिले जावे, यामुळे विद्यार्थ्यांना सहा ऐवजी चार पुस्तकच न्यावी लागतील अशा काही उपाययोजनाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवल्या. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये राज्याच्या अन्य प्रश्नांवरीही चर्चा झाली.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज ठाकरे सरसावले
वाढदिवसाच्या शुभेच्छा