वृत्तपत्रे व पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागणार

0
16

महासंचालकांसमवेत सेवा संघ पदाधिकाèङ्मांची निर्णायक बैठक
मुबई (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील वृत्तपत्रे व पत्रकारांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्ङ्मासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासंबंधी लवकरच मुख्यमंत्र्यासमवेत सविस्तर बैठक होऊन ठोस निर्णय घेतील असा विश्वास वृत्तपत्रे व पत्रकार संघटना महासंघाचे अध्ङ्मक्ष रविंद्र बेडकिहाळ यानी व्यक्त केला आहे.महिती व जनसंपर्क महासंचालक चंद्रशेखर ओक यांचे दालनात दीड तास चाललेल्या बैठकीत महत्त्वाच्ङ्मा प्रश्नांसंबंधी सविस्तर बैठक झाली. या बैठकीसाठी महासंघाचे अध्ङ्मक्ष रविंद्र बेडकिहाळ, समन्वङ्मक व संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष किसन भाऊ हासे, समन्वङ्मक नरेंद्र लचके, ज्ङ्मेष्ठ संपादक रमेश खोत, राजभवन प्रेस फोटोग्राफर अरूण कुलकर्णी, आर.वाय. जाबा, ओमप्रकाश िशदे, वाय.के. नारायणपूरकर, जैन सर, अमर शेंडे, सौ. अलकाताई बेडकिहाळ यांच्यासह संचालक शिवाजीराव मानकर, कुडके हे उपस्थित होते.
महासंचालकासमवेत झालेल्ङ्मा बैठकीत प्रामुख्ङ्माने जाहिरात दरवाढ, पत्रकारांना मानधन व संरक्षण कायदा, अधिस्विकृती समितीची निमिर्ती, महाराष्ट्र प्रेस कौन्सिल निमिर्ती, ई-टेंडर्सना वृत्तपत्रात सविस्तर प्रसिद्धी, जिल्हा स्तरावर पत्रकार प्रशिक्षण, पुरस्कार, आरोग्य योजना इ. प्रश्नांसंबंधी चर्चा होऊन यासंबंधीचे प्रस्ताव मुख्यमंत्र्याना असल्याची माहिती महासंचालकांनी शिष्टमंडळास दिली.
वृत्तपत्रे व पत्रकारांचे प्रश्न सोडवणूकीसाठी सातत्ङ्माने प्रयत्न करीत असताना महासंचालनालयातील अधिकारी व मुख्यमंत्री कायार्लयाचे सचिव यांना मुख्यमंत्र्यासमेवत त्वरीत बैठक आयोजित करण्यासाठी ‘मुख्यमंत्र्याचे विशेष कायक्रम अधिकारी रविकिरण देशमुख व श्री. जाधव यानाही माहिती देऊन पत्र देण्यात आले.
महाराष्ट्रातील वृत्तपत्रे व पत्रकारांच्ङ्मा सर्व संघटना पदाधिकाèङ्मांची बैठक जानेवारी अखेरीस पुणे येथे घेण्यात येणार असल्ङ्माचे महासंघाचे अध्यक्ष रविंद्व बेडकिहाळ यांनी जाहीर केले.