बार्टीच्या महासंचालकपदी आयपीएस कैलास कणसे

0
19

नागपूर,दि.30ः- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) महासंचालकपदी गडचिरोलीचे राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक कैलास कणसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय पोलिस सेवा संवर्गातील (आयपीएस) अधिकारी आहेत. या पदावर आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या नियुक्तीमुळे प्रशासनात मात्र चांगलीच नाराजी पसरली आहे.
बार्टीच्या निर्मितीपासूनच येथे आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. बार्टीचे पहिले महासंचालक परिहार हे वनसेवा संवर्गातील अधिकारी होते. त्यांच्यानंतर राजेश ढाबरे यांची नियुक्ती करण्यात आली. ते भारतीय कर संवर्गातील अधिकारी होते. आता आयपीएस संवर्गातील अधिकारी कणसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कणसे नागपूर शहर येथे उपायुक्त पदावर कार्यरत होते. या पदावर आयएएस संवर्गातील अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्याने अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या पदावर नियुक्तीसाठी सामाजिक न्याय विभागामध्ये अतिरिक्त आयुक्त पद हे महासंचालक दर्जाचे आहे.