उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने यांचा सत्कार

0
10

देवरी ग्राम पंचायतीच्या वतीने देवरी पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांचा जाहीर सत्कार करताना पदाधिकारी. (छाया- सुरेश भदाडे, देवरी)

देवरी- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आज देवरी ग्राम पंचायतीच्या वतीने आदर्श अधिकारी म्हणून देवरीचे पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन शि. राजमाने यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
स्थानिक क्रीडा संकुलाच्या मैदानात आयोजित शासकीय ध्वजारोहणानंतर आयोजित कार्यक्रमात श्री राजमाने यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार देवरी ग्राम पंचायतीच्या पदाधिकाèयांनी केला. यावेळी उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने, तहसीलदार संजय नागतिळक, देवरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अधिकारी भागूजी औटी, गटविकास अधिकारी एस एन मेश्राम, नायब तहसीलदार यामावार, डोंगरे, मिश्रा यांचेसह सर्व विभागांचे खातेप्रमुख, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, वकील, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. राजमाने यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.