मंत्रालयाच्या पहिल्या माळ्यावर पुन्हा आग

0
9

मुंबई ,दि.5(विशेष प्रतिनिधी)ः-मंत्रालयाच्या पहिल्या माळ्यावर  रात्री  १०:००ते१०:२० च्या कालावधीत अचानक  शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या तात्काळ दाखल झाल्याने अग्निशामक दलाला आग विझवण्यात तत्पर  यश आले.   सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवीत हानी झाली नाही ही आग विस्तारीत मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर स्विच बोर्डमध्ये किरकोळ शाॅर्टसर्किट होवून ,आग लागल्याची घटना घडली असून,याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटणास्थळावर दाखल झाल्या आणि काही मिनिटांमध्ये ही आग विझवण्यात यश आले.  या आधी २०१२ आणी  २०१४ रोजी दोनवेळा   मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर शाॅर्टसर्किटनेच आग लागल्याची घटना घडली होती. आणि रात्री  ४ डिसेंबर २०१७ रोजी पहिल्या मजल्यावर आग लागल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मंत्रालयातील विद्युत जोडणी व्यवस्थेचा  कामाबद्दलचा मोठा गंभीरतेचा असल्याचे  पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे