23.1 C
Gondiā
Sunday, August 30, 2026
Home Top News लोकशाहीवर विश्वास नसेल तर, त्या डाॅक्टरावर गोळ्या घालू-अहीर

लोकशाहीवर विश्वास नसेल तर, त्या डाॅक्टरावर गोळ्या घालू-अहीर

0
29

चंद्रपूर ,दि.25- केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात बनविण्यात आलेल्या अत्याधुनिक मेडिकल स्टोअरचे उद्घाटन केले. या स्टोअरमधुन गरिबांना मोफत औषधे देण्यात येणार आहेत. यावेळी हॉस्पीटलमधील अनेक डॉक्टर हे ख्रिसमसच्या सुट्टीवर गेले असल्याचे सांगण्यात आल्यावर ते चांगलेच संतापले. त्यांनी अशा डोक्याच्या छातडयावर गोळ्या चालवू असे वक्तव्य केल्याने उपस्थित चांगलेच हादरले.

उद्घाटन सोहळ्यानंतर  ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अहिर यांनी दांडी मारणाऱ्या डॉक्टरांवर नाराजी व्यक्त केली. मात्र नाराजी व्यक्त करताना त्यांची जीभ घसरली आणि नवा वाद निर्माण केला. ‘मी जनतेने निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय राज्यमंत्रीपदावर आहे. मी इथे येणार हे माहित असूनही डॉक्टर रजेवर कसे जाऊ शकतात?, त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू’, असे वक्तव्य त्यांनी केले.