११ ते १४ जानेवारीला’ब्रम्हपुरी महोत्सव’

0
18

ब्रम्हपुरी,दि.25ः- येत्या ११ ते १४ जानेवारीला चार दिवस होऊ घातलेल्या ‘ब्रम्हपुरी महोत्सव’कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी विभागातील विविध कार्यकर्त्यांची सभा घेऊन चर्चा केली असून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
११ ते १४ जानेवारी या चार दिवस चालणा-या भव्य कार्यक्रमाला अनेक नामवंत व्यक्ती हजर राहणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष  अशोक चव्हाण, सयाजी शिंदे, सिनेसृष्टितील विनोदी कलाकार असरानी, राजु श्रीवास्तव, मुग्धा गोडसे, सिंधुताई सपकाळ, केतकी माटेगावकर, क्रिकेटर विनोद कांबळी, स्मिता शेवाळे, मिनाक्षी मोरे, आभास जोशी, सोनी चँनाल फेम दिपाली व योगेश यांचा समावेश राहणार आहे.या कार्यक्रमात भव्य कृषी प्रदर्शनी, मॅराथान स्पर्धा, आरोग्य शिबिर(कँसर व ह्दय तपासनी),पतंग स्पर्धा, युथ मोटिवेशनल प्रोग्राम, महानाट्य ‘शिर्डीके साईबाबा’ व सम्राट अशोक, होम मिनिस्टर स्पर्धा, सौंदर्य स्पर्धा, मिस ब्रम्हपुरी स्पर्धा, महिलांचे भव्य हळदी-कुंकू, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह म्युझिकल नाइट ची मेजवानी दिली जाणार आहे.

ब्रम्हपुरी महोत्सवा’ कार्यक्रमांची जबाबदारी प्राचार्य अमीर धम्मानी, प्रा. मोहन वाडेकर, खेमराज तिडके, बालुभाऊ राऊत, जि.प. सदस्य प्रा. राजेश कांबळे,विलास विखार, मनोज कावळे, जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, प.स.सदस्य थानेश्वर कायरकर, प्रा. चंद्रशेखर गणवीर, प्रा. रवी रणदिवे,अशोक रामटेके, एॅड. गोविंद भेंडारकर,प्रमोद मोटघरे, न.प.सदस्य रश्मीताई पेशने, न.प.सदस्य प्रतिभाताई फुलझेले, जि.प.सदस्य स्मिता पारधी, रेशमा लाखानी, श्री तुंडुलवार, राकेश पडोळे,पंदिलवार,भद्रूजी कोटेवार,सतिश कावळे, मंगेश दिवटे, जगदिश मेहेर, विक्की अँन्ड ग्रुप, जगदिश आमले,दिवाकर मातेरे,मुन्ना रामटेके,सोमेश्वर उपासे,महेश भर्रे,नितिन उराडे, सुधाताई राउत,रिताताई उराडे, मंगलाताई लोनबले, सौ. सावरकर,वनिताबाई ठाकरे, संदिप बगमारे, अमर गाडगे, प्रशांत नंदेश्वर, सुरेश वंजारी, सौ. आमले व अनेक कार्यकर्त्यांनी स्विकारली आहे.