भारतरत्न अटलजी हे कार्यकत्र्यांचे प्रेरणास्त्रोत : ना. बडोले

0
38
गोंदिया,दि. २५ -माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे या देशाचे कुशल प्रशासक व लोकप्रिय राजनेता म्हणून प्रसिद्ध आहेत. ते प्रसिद्ध कवी, पत्रकार व ओजस्वी वक्ता म्हणून जनमनात आहेत. त्यांनी अनेक जनकल्याणकारी योजनेच्या माध्यमातून देशाला विकास पथावर नेले. सुशासनातून समाजातील गरीब, शोषित, पीडितांचे कल्याण हेच त्यांनी शिकविले. ते भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शक असून प्रत्येक कार्यकत्र्यांचे ते प्रेरणास्त्रोत असल्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री कार्यालयात आज, सोमवार २५ डिसेंबर रोजी ‘सुशासन दिनङ्क म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री बडोले यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवासनिमित्त सर्व कार्यकत्र्यांना मिठाई वाटून ‘सुशासन दिनाङ्कच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे, भाजपा शहर अध्यक्ष सुनील केलनका, न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, ओबीसी प्रदेश सचिव विरेंद्र जायस्वाल,  भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, न.प. बांधकाम सभापती घनश्याम पानतवने, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन, प्रदिपqसह ठाकूर, अनुसूचित जाती आघाडी जिल्हाध्यक्ष रतन वासनिक,संजय कुलकर्णी,  कशिश जायस्वाल, जयंत शुक्ला,  नगरसेवक बंटी पंचबुद्धे, दीपक बोबडे, राजेश चतुर, संजय मुरकुटे, ऋषीकांत शाहू, धनंजय वैद्य, अभय अग्रवाल, अभय मानकर, सुधीर कायरकर, दारा बैरिसाल, हंसू वासनिक, मुजीब पठाण, श्याम चौरे, मिqलद बांबोडे, समीर बन्सोडे, मोन्या नागदवने, अशोक चव्हाण, विशाल चौरे, भोजराज बडोले आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.