चुलवड आश्रमशाळा मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे निर्देश : एस.टी.समितीचा दणका

0
9

नंदुरबार,दि.03(विशेष प्रतिनिधी) : अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज जिल्ह्यातील आदिवासी उपयोजनेअंतर्गत विविध कामांची पहाणी केली. काही ठिकाणी समितीला त्रुटी आढळून आल्याने त्या मुदतीत दूर कराव्या अशा सुचनाही देण्यात आल्या. समितीच्या 12 सदस्यांनी तीन विभाग वाटून घेतल्याने दिवसभरात जवळपास 42 ठिकाणी या समितीने भेटी दिल्या. त्यामुळे जिल्हाभरात शुक्रवारी समितीच्या भेटींचीच चर्चा होती.चुलवड येथील आश्रमशाळेतील समस्या पाहून आणि विद्याथ्र्याच्या तक्रारी लक्षात घेत तेथील मुख्याध्यापकांवर कारवाईचे निर्देश अनुसूचित जमाती कल्याण समितीने दिल्याने खळबळ उडाली आहे.
15 सदस्यीय समितीच्या तीन सदस्यीय उपसमितीने शुक्रवारी चुलवड व काकडदा या आश्रमशाळांना भेटी दिल्या. आमदार वैभव पिचड, आमदार पांडूरंग वरोरा, आमदार आनंद ठाकुर यांचा त्यात समावेश होता. चुलवड येथील विद्याथ्र्यानी समितीसमोर विविध समस्या मांडल्या. नाश्तामध्ये अंडी किंवा केळी अथवा गुळ किंवा शेंगदाणे देण्याचे निर्देश असतांना गेल्या दीड महिन्यांपासून ते मिळत नसल्याचे विद्याथ्र्यानी सांगितले. शाळेत गेल्या चार महिन्यांपासून वीजच नसल्याचीही बाब विद्याथ्र्यानी समितीच्या निदर्शनास आणून दिली. समितीने मुख्याध्यापक पी.एम.रामटेके यांना याबाबत विचारले असता व कागदपत्रे मागविले असता केळी व अंडी मागविण्यासंदर्भात कुठलाही पत्रव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रामटेके यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश समितीने दिले.
समिती गुरुवारी जिल्ह्यात दाखल झाली होती. सकाळी पाच आमदार येथे पोहचले होते. सायंकाळी उशीरा सात आमदार पुन्हा दाखल झाले. काही आमदार नंदुरबारात मुक्कामाला होते तर काहींनी थेट धडगाव गाठले. शुक्रवारी समितीतील सदस्य आमदारांनी गट अर्थात उपसमिती तयार केल्या. पहिल्या उपसमितीत समिती प्रमुख म्हणून आमदार श्रीकांत देशपांडे तर सदस्य म्हणून आमदार शांताराम मोरे, आमदार अमित घोडा, आमदार संजय कांबळे यांचा समावेश होता. या उपसमितीने नंदुरबार व नवापूर तालुक्यातील कामांना भेटी दिल्या. दुस:या उपसमितीचे प्रमुख आमदार अशोक उईके होते. सदस्य म्हणून आमदार संतोष टारफे, आमदार पास्कर धनारे, आमदार प्रभुदत्त भिलावेकर व आमदार राजेश तारवी यांचा समावेश होता. या समितीने तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील कामांना भेटी दिल्या. तिस:या उपसमितीचे प्रमुख आमदार वैभव पिचड होते. सदस्य म्हणून आमदार पांडुरंग वरोरा, आमदार आनंद ठाकुर यांचा समावेश होता. या समितीने शहादा व धडगाव तालुक्यातील कामांना भेटी दिल्या.