भुजबळ समर्थकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

0
13

मुंबई,दि.05(वृत्तसंस्था)- माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर आकस बुद्धीने कारवाई सुरू आहे. त्यांच्याविरोधात ईडी व एसीबीकडे कोणत्याही आरोपांचे पुरावे नाहीत तरीही त्यांना जामिन मिळू दिला जात नाही. त्यांच्यावर अन्याय केला जात असल्याच्या भावनेतून त्यांच्या समर्थकांनी आज सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईत सकाळी आकराच्या सुमारास शेकडो समर्थकांनी राज यांचे कृष्णकूंज निवासस्थान गाठले व भुजबळ साहेबांवर होत असलेल्या “अन्याय पर चर्चा” करण्यात आली. दरम्यान, पुढील महिन्यात मार्चमध्ये राज्यभरातील भुजबळ समर्थक 5 लाख लोकांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.

भुजबळ समर्थकांनी राज यांची भेट घेतली त्यात माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार शिरीष कोनवाळ, दिलीप खैरे, अंबादार खैरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी- कार्यकर्ते यांनी राजसमोर भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. यावेळी राज यांनी त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. तसेच राज्यात काय काय सुरू आहे याची मला माहिती आहे असे सांगत त्यांनी भुजबळांवर अन्याय होत असल्याचे अप्रत्यक्ष स्पष्ट केले. यासंदर्भात माझी व पक्षाची जेथे मदत लागेल तेथे आम्ही उभे राहू असा शब्दही राज यांनी भुजबळ समर्थकांना दिल्याचे कळते. यावेळी राज यांनी ‘भुजबळ जोडो अभियान’ ऐवजी ‘भुजबळ छोडो अभियान’ राबवा असे समर्थकांना सुचवले. राज यांच्यासमवेत मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत उपस्थित होते.