गोंदियातील मतदान केंद्रावर मतदान रोखले

0
11

गोंदिया-65, तिरोडा-30, लाखनी-88 मतदान केंद्रावरील इव्हीएम मध्ये बिघाड

दोन तास मतदान प्रक्रिया पूर्वपदावर आली नाही तर मतदान प्रक्रिया बंद

निवडणुक रद्द होणार? राजकीय तर्कवितर्क सुरू

पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघातील मतदान केंद्रावर मोठ्याप्रमाणात व्हीव्हीपीटी मशीनमध्ये बिघाड आल्याने मतदान थांबले आहे.तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील  30,तुमसर विधानसभा मतदारसंघातील 11,अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील खामखुरा व इटखेडा मतदान केंद्रवारील मशीनमध्ये बिघाड आल्याने मतदानाच्या काही वेळानंतरच मतदान थांबले आहे.या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात येत आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स सुरत आणि बडोदा येथून आणण्यात आली आहेत.