भंडारा-गोंदियातील 75 टक्के मतदान केंद्रावर मतदान ठप्प

0
16

गोंदिया शहरातील तीन मतदान केंद्रावर मतदान रोखले,गोंदिया मतदारसंघातील 35 मतदान केंद्रावरील मतदान बंद

गोंदिया/भंडारा,दि.28- पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघातील मतदान केंद्रावर मोठ्याप्रमाणात व्हीव्हीपीटी मशीनमध्ये बिघाड आल्याने मतदान थांबले आहे.त्यातच गोंदिया शहरातील गणेशनगर येथील मतदान केंद्र क्रमांक 225 व मरारटोली येथील बीएचजे काॅलेजमधील मतदान केंद्र क्रमांक 169 मध्ये मतदान बंद करण्यात आले आहे.तसेच फुलचूर येथील मतदान केंद्र 303 ए येथील केंद्रावरील व्हीव्हीपीटी मशीनमध्ये बिघाड आल्याने मतदान बंद करण्यात आले आहे.व्हीव्हीपीटी पॅडमशीनचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला मात्र याठिकाणी ही मशीन पुर्णता निकामी ठरली आहे.मतदारसंघाचा विचार केल्यास 75 टक्के मतदान केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.तिरोडा येथील मुरदाळा मतदान केंद्रावर 10 वाजेपासून मतदान बंद आहे.याच दरम्यान गोंदियाचे उपविभागीय अधिकारी व निवडणुक अधिकारी अनंत वालस्कर यांनी 38 मतदान केंद्रावरील मतदान थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळपासूनच मतदारसंघातील बहुतांश मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड येत असल्याने राजकीय पक्षातील कार्यकर्त्यामध्ये नाराजी दिसून येत आहे.गणेशनगर बुथवर नगरसेवक राजकुमार कुथे,कुशल अग्रवाल,आलोक मोहंती,संदिप रहागंडाले,बीएचजे मतदान केंद्रावर नगरसेवक घनश्याम पानतवने आदींनी मतदानकेंद्रातील बिघाडाबाबत नाराजी व्यक्त केली.गोंदिया शहरातीलच सिंधी शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 281 व संत तुकाराम हायस्कुल गायत्रीमंदीर चौक मतदान केंद्रावरही मतदान बंद पडले आहे.सरस्वती शिशु मंदिर,गोंदिया केन्द्रातील बूथ क्र. 253 वरील मशीन मध्ये बिघाड झाल्याने मतदान थांबले.सडक अर्जुनी तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक 163 कोकणा जमी येथील मतदान केंद्रावरही मतदान योग्य होत नसल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.उमरझरी,परसोडी,सौंदड येथील मतदान केंद्रावरही एक तासाहून अधिक काळापासून मतदान प्रकिया ठप्प पडली आहे.दवनीवाडा येथील मतदान केंद्रवारही मतदान बंद पडले आहे.कामठा येथील 115,116 व 117 मतदान केंद्रही बंद पडले आहेत.कन्हारपायली व पांढरवाणी येथील ईव्हीएममशीन मध्ये बिघाड आला आहे.

गोंदिाय विधानसभा मतदारसंघात 75 च्यावर बुथवर मतदान प्रकिया बंद असल्याचे वृत्त आहे.निलज येथील मतदान केंद्रावर तर मतदानच 1 तास उशीराराने सुरु झालेले आहे.तिरोडा मतदारसंघातील शहारवानी,कवलेवाडा,गोरेगाव,त्याचप्रमाणे लाखांदूर ( भंडारा ) तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावरील मशीन मध्ये बिघाड आला आहे.त्यामध्ये किन्हाळा, चिंचोली खैरना, मोहरणा, डोकेसरांडी व इतर अनेक केंद्रावर मतदान प्रक्रिया थांबली असूनमतदान केंद्र अधिकारी अभियंत्याच्या प्रतीक्षेत वाट बघत बसले आहेत. लाखनी तालुक्यातील मोरगाव, राजेगाव येथील बु़थ नं 54 व 55 मतदान मशिन मधे बिघाड आला असून 1तासापासून मतदान बंद पडले आहे.

साकोली विधानसभा मतदारसंघातील आतेगाव बुथ न. ७ येथील ईव्हीएम मशीन मध्ये मत कोणालाही दिल्यानंतर चिट्टी फक्त कमळाचीच निघत असल्याने मतदारांनी गोंधळ सुरु केला आहे. त्यामुळे मतदान बंद करण्यात आले आहे.तर गोंदिया विधानसभाम मतदारसंघातील इर्री,आसोली,मुरपार ,बघोली मतदारसंघात घडीला  मतदान केल्यावर व्हीव्हीपीटी मशीनमध्ये चिठ्टीच निघत नसल्याचे मतदारांनी आक्षेप नोंदविले आहे.