आश्वासने दिलीत, आता पळपुटेपणा करू नका – अजित पवारांची टीका

0
10

मुंबई-सत्तेत येण्यासाठी आश्वासने दिलीत, आता ती पूर्ण करण्याऐवजी पळपुटेपणा करू नका, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारवर केली. राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱयांना खडे बोल सुनावले.
ते म्हणाले, कोणत्याही प्रश्नावर नकारात्मक भूमिका घेण्याऐवजी राजकीय इच्छाशक्ती दाखवा. नैसर्गिक संकटे काही सांगून येत नाही. त्यामुळे सरकारने सबबी सांगण्याऐवजी
प्रत्यक्ष कारवाई करण्यावर भर द्या. सरकारने पळपुटेपणा न करता आश्वासने पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.