मराठा आरक्षणावरुन विरोधकांचा गोंधळ,बाळासाहेबांच्या नावासाठी शिवसेना आग्रही

0
16

मुंबई,दि.19ः- विधिमंडळ आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (दि.19) सुरुवात झाली आहे. त्यामुळे या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तापणार आहे. त्यातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्याचा सोपा मार्ग सुचवला आहे.ओबीसीतून उप प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, जेणेकरून ते न्यायालयात टिकेल, असे राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले आहेत. सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच विरोधकांनी ठिय्या आंदोलन केले.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीच्या आमदार विद्याताई चव्हाण यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना थांबवून ओला-उबर चालकांच्या प्रश्नाबाबत जाब विचारला आहे. तर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या; या मागणीसाठी शिवसेना आमदारांनी मागणी केली. या संदर्भात सोमवारी शिवसेना आमदारांनी विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.