यशवंतराव दाते स्मृतीसंस्थेच्या पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा !

0
25

वर्धा (प्रतिनिधी),दि.28ः-  यशवंतराव दाते स्मृती संस्थेने गेल्या ३० वर्षांपासून सातत्याने व्याख्यानमाला आयोजित करुन वैचारिक प्रबोधन आणि आपल्या साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट मराठी कादंबरीला ‘बाबा पद्मनजी साहित्य पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाला ‘शिक्षण व सहकारमहर्षी बापूरावजी देशमुख पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट कवितासंग्रहाला ‘संत भगवानबाबा काव्य पुरस्कार’ व ‘पद्माकर श्रावणे स्मृती बालसाहित्य पुरस्कार, भाऊरावजी शिंगाडे विनोदी साहित्य पुरस्कार‘ दिला जातो. रोख पाच हजार रुपये, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.
या शिवाय, डॉ. भा. ल. भोळे वैचारिक साहित्य पुरस्कार तसेच अंजनाबाई इंगळे तिगावकर स्मृती स्त्रीवादीसाहित्य पुरस्कार, डॉ. यशवंत सुमंत स्मृती प्रेरणा पुरस्कार देण्यात येत आहे. अनुवादीत साहित्याकरिता यशवंतराव दाते स्मृती अनुवाद पुरस्कार रोख दहा हजार रुपये स्वरुपात दिले जातात .
पुरस्कारासाठी मराठीतून लिहिलेल्या १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्याच्या प्रत्येकी दोन प्रती ५ जानेवारी २०१९ पूर्वी पोहचेल अशा बेताने सोबत लेखकाचा विस्तृत परिचय दोन छायाचित्रांसह पाठवावे. अनुवाद पुरस्काराकरिता इतर भाषेतील मराठीत अनुवादीत पुस्तकांचाच विचार केला जाईल.परीक्षण समितीचा निर्णय अंतिम राहील. पुरस्कार विजेत्यांची नावे जानेवारी २०१९ अखेरीस जाहीर करण्यात येतील. पुरस्कार वितरण समारंभ १ फेब्रुवारी २०१९ ला वार्षिक व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात वर्ध्यात होईल.

या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त साहित्यिकांनी/प्रकाशकांनी कादंबरी/कथा/काव्यसंग्रह/ वैचारिक साहित्य/स्त्रीवादीसाहित्य/बालसाहित्य/विनोदी/अनुवादीत पुस्तके पाठवून सहकार्य करावे,असे अध्यक्ष प्रदीप दाते, पुरस्कार समिती संयोजक प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे, कळविले असून पुस्तके संयोजक पुरस्कार समिती, यंशवंतराव दाते स्मृती संस्था, द्वारा प्रदीप दाते, शिवबावाडी, साबळे प्लॉट, वर्धा 442001 या पत्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी 07152-241051, 252510, 9422144817 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.