‘बुद्ध‘ हे नुसते नाव नसून ज्ञानाची उपाधी : विनोद अग्रवाल

0
15

गोंदिया,दि.28ः-दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जेतवन बौद्ध विहार ग्राम गर्रा खुर्द येथे ६२ वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरे करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख अतिथी म्हणून माजी जि . प. उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल उपस्थित होते. तसेच सरपंच डिलेश्वरी येड़े, माजी उपसरपंच सोनाताई बोपचे , भोयर , पोलीस पाटील विनोद सहारे, बौद्ध महासभेचे अध्यक्ष (गर्रा ) कुवेश्वर राऊत , आदेश नंदेश्वर, दिनेश दरवडे , संदीप दरवडे , अतुल नंदेश्वर, ग्रा. प. सदस्य धनवंत पटले, ग्रा. प. सदस्य मेश्राम सर, सुनील टेम्भूर्णे , राजू सहारे, अरविंद देशभ्रतार , संजय चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलता विनोद अग्रवाल म्हणाले कि ‘बुद्ध‘ हे नुसते नाव नसून ज्ञानाची उपाधी आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी  असे असून गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नाने हे मिळवले आहे.त्याचप्रमाणे जगातील प्रत्येक नागरिकाने स्व-कर्तृत्वाने यश मिळवून ते टिकवणे खूप गरजेचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी आपले जीवन अर्पण केले. आपण सुद्धा त्यांच्या आदर्शांवर चालत मोठे होण्याचे, स्वतःचे नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे विचार मांडले. गौतम बुद्धांनी आपल्याला खूप मोठी शिकवण दिली त्यात चार आर्यसत्वे, अष्टांग मार्ग, बुद्ध धर्माचे तिन अंगे ( शील, समाधी आणि प्रज्ञा ) तसेच जी सात वृद्धी कारक धर्म जे सांगितले त्याचे आचरण करून मानवी जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.संचालन जियालाल बोपचे शक्ती प्रमुख यांनी केले.कार्यक्रमाला वसंतराव रहांगडाले, मणिलाल पटले, योगराज टेम्भ्ररे , विनोद सहारे, मुनन्नालाल भगत, सुनील भागात, कापूरचंद तुर्कार, नरेश रहांगडाले, चंदन साठवणे , देवराज साठवणे, जगंलाल पटले, धनीराम पटले, दिलीप गौतम, तालिकराम ठाकरे, गजेंद्र गवळी , मोहन बोपचे, हरिचंद बोपचे, धनीराम पटले, भागवत मेश्राम, त्रिभुवन हरिणखेडे, रतिराम रहांगडाले, रमेश दरवडे, कमलेश लांजेवार, कोठूजी भगत , क्लेशजी सोनवणे, रेखलालजी ठाकरे, लजपत बिसेन, आणि सुरेश टेमभऱे तसेच अन्य गावकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.