महानंदच्या अध्यक्षांसह थकबाकीदार सात संचालकांचे सदस्यत्व रद्द

0
6

मुंबई, दि.१७ मार्च – महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद या संस्थेच्या अध्यक्षांसह थकबाकीदार सात सदस्यांचे सभासदत्व १६ मार्च, २०१५ पासून रद्द करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांनी काढला आहे.
सहा वर्षापूर्वी शासनाची पूर्व परवानगी न (न) घेता चीन व इस्रायलचा दौरा करणे, सात संचालकांनी महानंद कडून इस्रायल दौऱ्यासाठी प्रत्येकी ९० (नव्वद) हजार रुपये, तर चीन दौऱ्यासाठी प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये अग्रीम घेणे, तसेच हा अग्रीम त्यांनी संस्थेत जमा न (न) करणे व या खर्चास शासनाची मान्यता देखील न (न) घेणे या प्रमुख कारणासाठी वरील सात सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. महानंद वर निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ३४ असून पैकी एक पद रिक्त आहे.
महानंदच्या ज्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे, त्यामध्ये (१) सौ.वैशाली नागवडे-अध्यक्षा (२) राजेंद्र जाधव-उपाध्यक्ष (३) विनायक पाटील-माजी अध्यक्ष (४) दिपक पाटील-माजी उपाध्यक्ष (५) सुनिल फुंडे (६) रामराव वडकुते व (७) निळकंठ कोंढे यांचा समावेश आहे.
१९६० च्या महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार थकबाकीदार असलेल्या संचालकांना अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. त्यानुसार वरील कारवाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणातील आदेशान्वये अशा प्रकरणी नोटीस न (न) बजावता थेट कारवाई करण्याचे निबंधकांचे आदेश कायम केले आहेत.