सालेकसा, देवरीला चक्रीवादळाचा तडाखा

0
4

गोंदिया- : सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुसाट वाèयासह पाऊस आणि गारपीट झाली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सालेकसा आणि देवरी तालुक्यातील काही गावांतील घरांवरील पत्रे उडाले. सालेकसा तालुक्यातील गांधीटोला येथे तीन बैल ठार झाले. अनेक झाडे उन्मळून पडली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी रात्रीला सुध्दा जिल्ह्यात गारासंह पावसाने हजेरी लावली.
ेआकाश निरभ्र असताना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आकाशात ढग जमले. साडेबारा वाजताच्या दरम्यान वारा, पाऊस झाला. सुमारे अर्धा तास गारपीट झाली. उन्हाळ्यात गारपीट होत असल्याने अनेकांनी घराबाहेर पडून गारा वेचण्याचा आनंद लुटला. परंतु, सालेकसा आणि देवरी तालुक्यात वारा, पाऊस, गारपिटीसह चक्रीवादळाचा देखील तडाखा बसला. देवरी तालुक्यातील हरदोली, सोनारटोला, पाऊडदौना, डोंगरगाव, लोहारा, सुरतोली, मुल्ला आदी गावांतील घरांवरील पत्रे, कवेलू उडाले. शेतातील ऊस, हरभरा, लाखोळी, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सालेकसा तालुक्यात चक्रीवादळाने कहर केला. गांधीटोला येथे गोठा कोसळून तीन बैल जागीच ठार झाले. गिरोला, नदीटोला, सोनारटोला, बोदलबोडी या गावांतील झाडे पडली. घरांवरील पत्रे उडाले. गारपिटीमुळे पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. महसूल विभागाने तातडीने सर्वेक्षण करून मदत जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
शेंडा : परिसरात सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गारपिटीसह पाऊस आला. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे हरभरा, गहू, उळीद, लाखोळी आणि रब्बी धानाचे नुसकान झाले. आधीच वन्यप्राण्यांमुळे शेतातील पिकाचे उत्पादन अध्र्यावर येण्याची शक्यता असताना आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले. शासनाने तातडीने चौकशी करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकèयांनी केली.