‘त्या’ ग्रामसेवकाला जि.प. पाठीशी घालणार काय?

0
21

गोंदिया-ग्रामपंचायतीच्या दस्तऐवजात खोडतोड करणे आणि ग्रामनिधीचा अपहार करणे यासारखे गंभीर आरोप असलेल्या गोरेगाव तालुक्यातील दवडीपारच्या ग्रामसेवकांवर जिल्हा परिषदेची स्थायी कारवाई करण्याला विलंब करीत असल्याने नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या शहारे नामक ग्रामसेवकाने एकट्या दवडीपारमध्येच नाही, तर चिल्हाटीमध्येसुध्दा असे प्रकार केल्याचे समोर आले आहे. शहारे यांचेवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्याचा अहवाल पंचायत समितीने जिल्हा परिषदेला सोपवून देखील अद्याप कारवाई शून्य आहे. परिणामी, जिल्हा परिषद त्या ग्रामसेवकाला पाठीशी घालत इतरांनासुद्धा गैरव्यवहासाठी प्रोत्साहित तर करीत नसावी ना ? असा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत.
गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाèया दवडीपार व चिल्हाटी ग्राम पंचायतीत शासकीय दस्तऐवजात खोडतोड करणे आणि पैशाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ग्रामसेवक एच.आर. शहारे यांचे आहे. ग्रामसेवक शहारे यांच्या नौकरीचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला असून ग्राम पंचायत सदस्य व पदाधिकाèयांना विश्वासात न घेता काम करणे व वातावरण दूषित करण्यास कारणीभूत ठरल्याचा प्रकार बघावयास मिळाला आहे.
ग्रामसेवक शहारे याचेमुळे दवडीपार येथील गावातील वातावरणसुद्धा चांगलेच तापले होते. सोबत शासकीय रकमेचा गैरवापर करीत ग्रा.पं.सदस्यांच्या प्रश्नांना टाळून सरपंचाच्या संमतीने रेकार्डमध्ये खोडतोड करण्याचा प्रयत्न केला. शहारे यांच्या विरुद्ध पंचायत समितीच्या चौकशी समितीने केलेल्या चौकशीत सामान्य फंड खाते क्रमांक १८९ मधून १७ हजार ७६१ रुपये बँकेतून काढून परत जमा करणे, नमुना २२ नुसार माहितीच्या अधिकारात ग्रामसेवक शहारे यांनी ज्या मजुराची नावे नाली स्वच्छतेच्या कामावर दाखविली होती, त्या नमुना २२ मध्ये पूर्णपणे बदल करीत चौकशी अहवालात मात्र दुसरीच नावे दिल्याचे समोर आले. त्यातही मजुरांना १५० रुपये रोजी दिल्याचे सचिवाने नमूद केले आहे. मात्र, मजुरांनी २०० रुपये मजुरी मिळाल्याचे चौकशी अधिकाèयाला सांगितल्याने या प्रकरणात ग्रामसेवकासह मजूरही संशयाच्या भोवèयात आहेत.
१३व्या वित्त आयोगातून गोंदियाच्या शिवनाथ एंटरप्राइजेस येथून सौरदिवा बॅटरी खरेदी करण्यात आल्याची देयके ३१.१०.२०१४ रोजी नोंद केले आहे. मात्र, ग्रापं कर्मचाèयानुसार सदर साहित्य ११ फेबु्रवारी २०१५ नंतर ग्रा.पं.मध्ये आले. २६ ऑगस्ट २०१४ रोजी घेण्यात आलेली आमसभा सुद्धा अवैध असल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चौकशी अधिकाèयाने दिलेल्या अहवालानुसार दवडीपार ग्राम पंचायतीच्या आर्थिक व्यवहारात व दस्तऐवज हाताळणीत सचिवासह सरपंच ही दोषी असल्याचे म्हटले आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेच्या पंचायत विभाग या चौकशी अहवालावर काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्थिक गैरव्यवहार करणाèया सचिवाला जिल्हा परिषद पाठीशी घालते की त्याच्यावर निलंबनाची कारवाई करते, याकडे ही लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे याच ग्रामसेवकावर चिल्हाटी ग्राम पंचायतीमध्ये ११ महिने स्वत:जवळ ७५ हजार रुपये ठेवून आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरणे घडले होते. त्याशिवाय मागासक्षेत्र अनुदान निधी व महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या निधीचा वापर स्वत: करिता केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. चौकशी समितीने चिल्हाटी ग्राम पंचायतीमध्ये ४५ हजार ४७० रुपयाचा संशयित अपहार शहारे यांनी केल्याचे म्हटले आहे.