विधानपरिषद प्रश्नोत्तरे :
मुंबई : पोलीस शिपायांनी साप्ताहीक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याच्या दरात वाढ करण्यात येणार असल्याचे विधान परिषदेत लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.पोलिसांना सध्या मिळणारा भत्ता हा अत्यल्प असून नांदेड येथील पोलीस शिपायाने त्याचे मानधन पोलीस महासंचालक कार्यालयास परत पाठविल्याच्या घटनेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
बोगस प्रमाणपत्रचा वापर करणाऱ्या विकासकावर फौजदारी कार्यवाही करण्यात येईल- प्रकाश मेहता
अंधेरी (मुंबई) येथील सनशाईन बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या विकासकाने गुंदवली येथील महाकाली दर्शन व महाकाली दर्शन-अ या दोन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे ना-हरकत प्रमाणपत्र मिळविल्याचे दिसून आल्याने फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आज सांगितले.