मुंबई-वन्य प्राण्यांसाठी आणि जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यासाठी वन क्षेत्रात छोट्या बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेगांवजवळील वाघोली जंगलातील मेसा येथून बंधाऱ्याचे दगड ट्रॅक्टर व्यावसायिकांनी रेती सोबत चोरी करुन त्यांची विक्री केल्याबाबत सदस्य सुरेश धानोरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री.मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, चंद्रपूर वन विभागातील वरोरा वन परिक्षेत्रातील वाघोली मेसा जंगलातील नाल्यावर बंधारे बांधण्यात आले आहेत. ज्या बंधाऱ्याच्या दगडाची चोरी झाली आहे त्यांची चौकशी सुरु आहे. यात दोषी असतील तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.