पालिकेच्या उद्यान सुरक्षा रक्षकांचा नागरिकांशी उद्धटपणा

0
22
मुलंड पूर्व(शेखर भोसले)दि.27ः– येथे असलेल्या महानगर पालिकेच्या चिंतामण देशमुख उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी एसएसएएस (SSAS) नामक कंपनीचे नेपाळी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत. अत्यंत उद्धटपणे बोलणे, अरेरावीपणे वागणे व उर्मट उत्तरे देणे ह्यासंबंधीच्या या सुरक्षा रक्षकांच्या तक्रारी उद्यानात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिक, महिला वर्ग व इतरांकडून सातत्याने येवू लागल्या होत्या. अश्याच काही तक्रारी मुलुंड पूर्व येथील शिवसेना शाखेत काही नागरिकांकडून आल्यावर शिवसैनिकांनी ह्या उद्यानात जावून तेथील सुरक्षा रक्षकांना याचा जाब विचारला व शिवसेनेचा शिवसैनिकी हिसका दाखविल्यानंतर या बेजबाबदार नेपाळी सुरक्षा रक्षकांनी आपल्या चुकी मान्य केली व ह्यापुढे उद्यानात येणाऱ्या नागरिकांशी अश्या प्रकारे उर्मटपणे वागणार नाही व सर्वांशी नम्रतेने वागण्याचे कबूल केले. ह्या सुरक्षा रक्षक एजेन्सीचे मालक श्री यादव ह्यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांचा मोबाईलशी संपर्क होवू शकला नाही. पालिकेच्या उद्यान विभागाने ह्या प्रकरणी लक्ष घालून या सुरक्षा रक्षक एजेन्सीला ताबडतोब काढून ह्या ठिकाणी नागरिकांशी सभ्यपणे व विनम्रपणे व्यवहार करणारे चांगले सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत अशी मागणी उद्यानात येणाऱ्या नागरिकांकडून जोर करू लागली आहे.