26.6 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ किसान क्रेडीटकार्ड वितरणाकरीता मेळाव्याचे आयोजन-सुनिल फुंडे

किसान क्रेडीटकार्ड वितरणाकरीता मेळाव्याचे आयोजन-सुनिल फुंडे

0
133
भंडारा,दि.27 : जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने किसान क्रेडीट कार्ड योजना राबविण्यात येणार आहे. जे शेतकरी सेवा सहकारी संस्थेचे सभासद झाले आहेत, परंतु त्यांनी अद्याप किसान क्रेडीट कार्ड खाते उघडलेले नाही अशा शेतकर्‍यांचे, कर्जदार थकबाकीचे किसान क्रेडीटकार्ड खाते उघडण्याकरीता तसेच ज्या शेतकर्‍यांनी किसान क्रेडीट कार्ड खाते उघडलेले आहे. परंतु त्यांना अद्याप किसान क्रेडीट कार्ड वाटप करण्यात आले नाही त्यांना सदर कार्ड चे वाटप करण्याकरीता भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधीत सर्व शाखांमध्ये दि. १,३ व ५ मार्च रोजी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्यात किसान क्रेडीट कार्ड देण्यात येणार आहे.
सेवा सहकारी संस्थांच्या सभासदांनी किसान क्रेडीट कार्ड खाते उघडण्याकरीता आपल्या सोबत आधार कार्ड, पॅनकार्ड, २ पासपोर्ट फोटो, ७/१२ उतारा, नमुना ८ अ घेवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधीत शाखेत लाभधारकांनी उपस्थित राहण्याची गरज आहे.
केंद्रशासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या धोरणानुसार पशुपालन, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन करणार्‍या शेतकर्‍यांना खेळत्या भांडवलाची गरज पुर्ण करण्यासा’ी अल्पमुदत कर्ज किसान क्रेडीट सुविधेअंतर्गत देण्यात येणार आहे. कर्जावरील पिक कर्जाप्रमाणे व्याज सवलत देण्याची बाब देखील शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांच्या सर्व सभासदांना किसान क्रेडीट कार्ड आवश्यक असल्यामुळे जिल्ह्यात होवू घातलेल्या दि. १,३ व ५ मार्च रोजी मेळाव्याच्या दिवशी उपस्थित राहून शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले आहे.
शेतकर्‍यांना आवाहन
जिल्ह्यातील जे शेतकरी सेवा सहकारी संस्थेचे सभासद झाले आहेत, परंतु त्यांनी किसान क्रेडीट कार्डचे खाते उघडले नाही,अशा शेतकर्‍यांचे किसान क्रेडीट कार्ड काढून देण्यात येणार आहे. याशिवाय ज्यांना किसान कार्डचे वितरण करण्यात आले नाही अथवा अद्याप घेवून गेले नाहीत त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्पेâ दि. १,३ व ५ मार्च रोजी मेळाव्याचे आयोजन करून त्या मेळाव्यात कार्ड दिले जाणार आहेत. हे मेळावे बँकेच्या सर्व शाखांमध्ये होणार असून यामध्ये बँकेच्या कर्जदार थकबाकी असणार्‍या सभासदांनी सुध्दा किसान क्रेडीट कार्डचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले आहे.