स्वस्त दरात भाजीविक्री केंद्र

0
16

मुंबई,दि.२८ ः–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतुन साकारलेले आणि शिवसेनेचे विभाग क्र ७ चे विभागप्रमुख रमेश कोरगावकर ह्यांच्या माध्यमातून आयोजित शेतकरी ते शाखा स्वस्त दरात भाजी विक्री योजनेचे उद्धाटन गुरुवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी शिवसेना शाखा क्र .१०४, एम जी. रोङ, मुलुंङ (प.) येथे युवासेना मुलुंड विधानसभा अध्यक्ष  अमित चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ह्यावेळी शिवसेनेचे मुलुंड येथील उपविभागप्रमुख सर्वश्री सुनिल गारे, दिनेश जाधव, मुलुंड विधानसभा कार्यालयप्रमुख सिताराम खांडेकर, शाखाप्रमुख आनंद पवार, निलेश मोरे, संजय दळवी तसेच शिवसैनिक संजय माळी, तुषार शिंदे, सागर घोडे, स्वप्निल सुर्यवंशी, नयन पेडणेकर, अमित सावंत, संदेश मोढवे आणि इतर अनेक युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.स्थानिक रहिवाश्यांना अत्यंत स्वस्त दरात या योजनेअंतर्गत ताजी भाजी उपलब्ध होणार आहे.