राज्यातील शेतक-यांसाठी केंद्राकडून २ हजार कोटींची मदत

0
6

नवी दिल्ली, – अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे हवालदील झालेल्या राज्यातील शेतक-यांना अखेर केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पीकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांच्या मदतीसाठी विशेष पथकही पाठवू अशी घोषणा कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांना अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपले होते. या नैसर्गिक आपत्तीने पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले होते. नुकसानामुळे कर्जबाजारी झालेल्या काही शेतक-यांनी आत्महत्यादेखील केली होती. अखेर केंद्रासातील मोदी सरकारने शेतक-यांच्या मन की बात ओळखून राज्यासाठी मदत जाहीर केली. दिल्लीत दुष्काळ व अवकाळी पावसने झोडपलेल्या राज्यांसाठी बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, कृषी मंत्री राधामोहन सिंह आदी उच्चस्तरीय नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी महाराष्ट्रासाठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.