28.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home महाराष्ट्र मुलुंडमध्ये शिवसेनेतर्फे शिवजयंती उत्सव साजरा

मुलुंडमध्ये शिवसेनेतर्फे शिवजयंती उत्सव साजरा

0
25

मुलुंड(शेखर भोसले),दि.23ः- मुलुंड शिवसेना शाखा क्र १०४ तर्फे शिवजयंती निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला शिवसैनिक, युवासैनिक व नागरिक उपस्थित होते. या मिरवणुकीतील शिवाजी राजे व मावळ्यांच्या वेषातील सैनिक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. डोलताश्या पथक, महिला लेझीम पथक, पुणेरी बाजा व आकर्षक रोषणाई पथक सह रथावर आरूढ शिवाजी महाराजांचा पुतळा या भव्य मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते.

विभागक्रमांक ७ चे शिवसेना विभागप्रमुख श्री रमेश कोरगावकर ह्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मिरवणुकीत उपविभागप्रमुख श्री सुनिल गारे, श्री दिनेश जाधव, मुलुंड विधानसभा कार्यालय प्रमुख सीताराम खांडेकर, मुलुंड संघटक  नितिन सावंत, शाखाप्रमुख  संजय दळवी, चंद्रकांत शेलार, कार्यालय प्रमुख सतीश बंदर कर, सागर घोडे, जयवंत जाधव, दुष्यंत पोतदार व इतर अनेक पुरुष व महिला शिवसैनिक उपस्थित होते. रस्त्यावर दुतर्फा उभे राहून नागरिक शांततेने पार पडलेल्या या मिरवणुकीचे निरिक्षण करत होते व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत होते.

blank